The mangroves started to grow again!

पालघरमध्ये केळवा आणि खारवडश्री येथे रो रो जेट्टी उभारण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत दोन जेट्टी उभारण्यात येणार असून या जेट्टीसाठी ७२ कांदळवन तोडण्यात येणार आहेत. मात्र झाडे किंवा कांदळवन तोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्यामुळे मेरिटाईम बोर्डाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    मुंबई :  पालघर येथे जेट्टी उभारण्यासाठी ७२ कांदळवन तोडण्याच्या परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने बॉम्बे इन्व्हायरमेन्ट ऍक्शन ग्रुप या संस्थेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत.

    पालघरमध्ये केळवा आणि खारवडश्री येथे रो रो जेट्टी उभारण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत दोन जेट्टी उभारण्यात येणार असून या जेट्टीसाठी ७२ कांदळवन तोडण्यात येणार आहेत. मात्र झाडे किंवा कांदळवन तोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्यामुळे मेरिटाईम बोर्डाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. पालघर तालुक्यातील केळवा येथील जेट्टी उभारणीसाठी एकही कांदळवन तोडण्यात येणार नसून केवळ खारवडश्री येथील कांदळवन प्रकल्पाला अडसर ठरत आहे. अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड साकेत मोने यांनी बाजू मांडताना खंडपीठाला दिली. त्यांचा हा युक्तीवाद ऐकून घेत बॉम्बे इन्व्हायरमेन्ट ऍक्शन ग्रुप या संस्थेला प्रतिवादी करण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.