ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….;मनसेचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे डोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

  मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे डोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

  संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

  ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

  राज ठाकरे काय म्हणाले होते?

  मुंबईतील जवजवळ सर्व कार्यलय सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवासा करावा लागतो. त्यात लोकल बंद असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होतीये. यामुळे रोग पसरण्याचा धोका आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

  तसेचं सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.