Strong rift in the Assembly; Opposition's resignation Marathwada, Vidarbha held hostage for 12 MLAs

महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळ‌ी अधिवेशन सोमवार 5 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकणार आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री देशमुख अडकल्याने ठाकरे सरकार अडचणीत असतानाच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

  मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळ‌ी अधिवेशन सोमवार 5 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकणार आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री देशमुख अडकल्याने ठाकरे सरकार अडचणीत असतानाच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

  अजित पवारही लक्ष्य

  साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित भागीदारीच्या मुद्यावरूनही भाजपा गोंधळ घालण्याची शक्यता आहे. आता ईडीच्या कार्रवाईमुळे पवारांच्याही अडचणी वाढल्या आहेत. तथापि पवार यांनी हात झटकत विरोधकांनाच आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
  मराठा-ओबीसी मुद्यांवरून कोंडी

  अधिवेशनात भाजपा मराठा व ओबीसी आरक्षणावरूनही सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाविरोधातील लढा हे मुद्देही प्रमुख असतील.

  6 जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक

  महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. या अधिवेशनात रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 6 जुलै रोजी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसीय अधिवेशन कालावधीत ठाकरे सरकारने या निवडणुकीबाबत तयारी पूर्ण केली आहे.

  थोपटेंचे नाव आघाडीवर

  ठाकरे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. तथापि सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आघाडीतील अन्य एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र थोपटेंच्या नावाला विरोध केला असल्याची चर्चा आहे.

  एवढेच नव्हे तर शिवसेनेलाही थोपटेंचे नाव मान्य नसल्याचे समजते. परंतु काँग्रेसने मात्र थोपटेंच्या नावाचाच हट्ट धरला आहे. या पदासाठी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश वरपुडकर आणि अमिन पटेल यांचेही नाव शर्यतीत आहे. एवढेच नव्हे तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद बहाल करून त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना ऊर्जामंत्रीपद दिले जाण्याचीही चर्चा काँग्रेस गोटात आहे.