…तसंही काँग्रेस, राष्ट्रवादी वाले सेटिंग-फेटिंग मध्ये नंबर एक आहेतच; बघा तुम्हीच नेमकं काय म्हणतात भाजप नेते

मुंबई :  काँग्रेस, राष्ट्रवादी वाले सेटिंग-फेटिंग मध्ये नंबर एक आहेत अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत  करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता राजकारण तापले असून भाजप नेते सरकारच्या या निर्णयावर टीका करत आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी  वृत्तवाहिन्यांना या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. त्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी वाले सेटिंग-फेटिंग मध्ये नंबर एक आहेत. असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवाकडून सदस्यांची पळवापळवी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.  तुमचं डोकं फुटेल पण आमचा एकही आमदार फुटणार नाही असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.