prakash ambedkar

रेखा ठाकूर वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा आहेत. दरम्यान, आंबेडकर यांनी तीन महिने सुटीवर जाण्याचे कोणतेही कारण दिले नाही. वैयक्तिक कारणांसाठी सुटीवर जात असल्याचे त्यांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. आंबेडकर यांनी व्हीडिओ शेअर करून हे सांगितले. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. मग आंबेडकर सुटीवर का जात आहेत?, असा सवाल केला जात आहे. वंचितने पाच जिल्ह्यातील निवडणुकांमधून अंग काढून घेतले आहे का? त्यासाठी आंबेडकरांनी सुट्टी घेतली आहे का?, असे सवाल या निमित्ताने केले जात आहे. आगामी काही दिवसात राज्यात मराठा, ओबीसी आणि मुस्लीम आरक्षणावरून वादळ उठण्याची चिन्हे आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरांचे सुटीवर जाणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

  मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैयक्तिक कारणांसाठी आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिन्यांसाठी दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे. या तीन महिन्यात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत, यासाठी त्यांनी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. मात्र पक्ष चालला पाहिजे. आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्त्वाचे आहे. यासाठीच रेखा ठाकूर यांची प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत.

  रेखा ठाकूर वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा आहेत. दरम्यान, आंबेडकर यांनी तीन महिने सुटीवर जाण्याचे कोणतेही कारण दिले नाही. वैयक्तिक कारणांसाठी सुटीवर जात असल्याचे त्यांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. आंबेडकर यांनी व्हीडिओ शेअर करून हे सांगितले. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. मग आंबेडकर सुटीवर का जात आहेत?, असा सवाल केला जात आहे. वंचितने पाच जिल्ह्यातील निवडणुकांमधून अंग काढून घेतले आहे का? त्यासाठी आंबेडकरांनी सुट्टी घेतली आहे का?, असे सवाल या निमित्ताने केले जात आहे. आगामी काही दिवसात राज्यात मराठा, ओबीसी आणि मुस्लीम आरक्षणावरून वादळ उठण्याची चिन्हे आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरांचे सुटीवर जाणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

  पाच जिल्ह्यांमधील निवडणुकांवर लक्ष

  आंबेडकर यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या काळात डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांना मदत करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीने 5 जुलैला मुस्लिम आक्षणाचा मुद्दा हाती घेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने रझा अकादमीला सोबत घेत हे आंदोलन केले होते. यापुढे आता वंचित बहुजना आघाडीला राज्यातील पाच जिल्ह्यांमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.

  सक्षमपणे आवाज उठविणार

  आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून उद्या सकाळी अकरा वाजता माध्यमांना हेल्थ बुलेटिन देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यानी दिली. त्या म्हणाल्या की, आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सर्व आंदोलनांना यशस्वीपणे सुरू ठेवले जाईल. कोरोना आणि लॉकडाऊनच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेला भोंगळ कारभार वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी उघड केला असून जनतेच्या रोजगाराचे आणि आरोग्याचे प्रश्न भीषण बनत चालले आहेत. त्या विरोधात पक्ष सक्षमपणे आवाज उठवत राहील. असे त्या म्हणाल्या.