अमित शहांचा नारायण राणेंना फोन, नेमकं काय चर्चा झाली ? : वाचा सविस्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नारायण राणे यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी माहिती दिली आहे.

    मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नारायण राणे यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी माहिती दिली आहे.

    अमित शहांनी पोलीस कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशीलही नारायण राणे यांना विचारल्याचं समजतंय. तसेच आम्ही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही. मात्र एक पक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठिशी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांना शिवसेनेने इंगा दाखवल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

    त्यामुळे सध्या मुंबई आणि दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमित शहांनी नारायण राणेंना फोन केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.