sanjay raut-amit shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या भुमिकेचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. संजय राऊत म्हणाले की, 'राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.' मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण राज्यातील भाजप नेत्यांनी केलं. जेडीयूच्या नेत्यांनी त्याचा बिहारच्या निवडणुकीत मुद्दा केला.

मुंबई : राज्यातील मंदिरे (Mandir) खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor Bhagat singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर अमित शाह (Amit Shah) यांनी आपली बाजू मांडत नाराजी दर्शवली होती. यावेळी राज्यपालांनी काही शब्दांचा वापर करायला नको होता. असे अमित शाह यांनी म्हटले आहे. अमित शाहांच्या याच भुमिकेमुळे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आभार मानले आहेत. तसेच या भुमिकेचे स्वागत केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या भुमिकेचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.’ मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण राज्यातील भाजप नेत्यांनी केलं. जेडीयूच्या नेत्यांनी त्याचा बिहारच्या निवडणुकीत मुद्दा केला. सीबीआय दोन महिने झालं तपास करतंय त्याचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ड्रग्जचा विषय फक्त बॉलीवूडचा नसून त्याचा संबंध संपूर्ण जगाशी आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्रातील मंदिरे (Mandir ) खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor Bhagat singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न केला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत उत्तर दिले होते.