amitabh bachchan on mask on corona virus situation
बिग 'बीं'ची मुंबईकरांना भावनिक साद; केलं हे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ‘दो गज की दुरी, मास्क है जरुरी,’ असे आवाहन बिग बी अमिताभ बच्चन यांनी पालिकेच्यावतीने मुंबईकरांना केले आहे.

मुंबई : मुंबईत (Mumbai) कोरोना (corona) नियंत्रणात (control) येत असला तरी अजूनही हे संकट टळलेले नाही. त्यात काही जण सार्वजनिक ठिकाणी (public place) मास्क (mask) तसेच सोशल डिस्टन्सिंग (social distancing) पालन करत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, ‘दो गज की दुरी, मास्क है जरुरी,’ असे आवाहन बिग बी अमिताभ बच्चन यांनी पालिकेच्यावतीने (mcgm) मुंबईकरांना (mumbaikars) केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना विषाणूवर औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे वागणे धोकादायक ठरू शकते. काही लक्षणे असल्यास मदतीसाठी १०७५ या हेल्पलाईनवर संपर्क करा. नियम पाळू या आणि आपण सगळे मिळून कोरोनाला हरवू या, असे आवाहन बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऑडिओ टेपच्या माध्यमातून मुंबईकरांना केले आहे.