amruta fadanvis

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू यानंतप पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची अटक. यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघेले आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू यानंतप पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची अटक. यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघेले आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

    फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट शिवसेनेलर निशाणा साधला आहे. कोण कोणास म्हणाले व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहून… असे ट्विट अमृता यांनी केले आहे.

    या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकराच्या कोरोना मोहिमेवर निशाणा साधलाय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “माझी जबाबदारी ” मोहिम सुरु केली आहे. अमृता यांचे ट्विट म्हणजे मुख्यमंत्र्यांना टोला आहे. दरम्यान, वाझे प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील अधिवशनादरम्यान चांगलेच आक्रमक झाले होते.