Shiv Sena is referred to as 'Shavasena'; Amrita Fadnavis criticizes Thackeray government

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदच्या(Maharashtra bandh) भुमिकेवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत आहे, तसेच आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो. पण, राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बांधावरच्या घोषणांचे काय झाले, असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला आहे. अमृता फडणवीस(Amrita Fadnavis) यांनीही ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

  मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदच्या(Maharashtra bandh) भुमिकेवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत आहे, तसेच आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो. पण, राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बांधावरच्या घोषणांचे काय झाले, असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला आहे. अमृता फडणवीस(Amrita Fadnavis) यांनीही ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

  आज वसूली चालू आहे का बंद?

  दरम्यान, आज वसूली चालू आहे का बंद? असा सवाल अमृता फडणवीस यांनी ट्विट करत विचारला आहे. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी #MaharashtraBandhNahiHai हा हॅशटॅगही जोडला आहे. बंदवरुन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यानी देखील व्टिट करत आघाडी सरकारला खोचक सवाल केला आहे.

   

  बंद केवळ ढोंगीपणाचा कळस

  फडणवीस म्हणाले की, हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस आहे, लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो, पण राज्यातील शेतकऱ्यांना मदत नाही. महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जात केलेल्या घोषणा हवेत विरल्या, अशी टीका फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

  शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे हेच सरकार

  मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे हेच सरकार होते, राजकीय पोळी भाजण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे. मुळात हे राज्य सरकारच बंद सरकार आहे,अशी टिका फडणवीस यांनी केली. बंदसाठी धमक्या देत प्रशासनाचा वापर करत बंद केला जात आहे. आज दिवस पूर्ण होण्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील अथवा ढोंगी सरकार पुन्हा सिद्ध होईल, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

  राजभवनसमोर जाणारे मराठवाड्यात गेले नाहीत

  राजभवनसमोर नेते गेले पण मराठवाड्यात शेतकऱ्यांना भेटायला गेले का? पालकमंत्री तिथे गेले का? असा सवाल करत सगळं मीडियासमोर दाखवण्यासाठी होत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसेस फोडल्या, हे सर्व ठरवून केले जात आहे. तोडफोडची नुकसान भरपाई ज्यांनी बंद केले त्यांच्याकडून केली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.