अमृता फडणवीसांचा मुंबई पोलीसांवर अविश्वास, या शिवसेना नेत्याने केली खरमरीत टीका

  • राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलीसांवर अविश्वास दाखवल्याने वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामुळे अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात ट्विटर वर शाब्दिक युद्ध रंगले आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचे आत्महत्या प्रकरण चांगलेच रंगले आहे. सुशांतच्या चाहत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. तर आता या प्रकरणात राजकारणी देखील उडी घेत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलीसांवर अविश्वास दाखवल्याने वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामुळे अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात ट्विटर वर शाब्दिक युद्ध रंगले आहे. 

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ट्विट केले आहे की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने हाताळला जात आहे, त्यावर मला वाटते की मुंबईने मानवता गमावली आहे. त्यामुळे निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे अधिक सुरक्षित राहिेलेले नाही. अशा आषयाचे ट्विट आमृता फडणवीस यांनी केले आहे. 

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटला शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. यावर वरुन सरदेसाई म्हणाले की, मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! आणि  ह्याच मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात नाचलात – गायलात. किती कृतघ्न होणार ? अशा शब्दात टीका केली आहे. तसेच मुंबई पोलीसांवर आमचा विश्वास आहे. असेही ते म्हणाले आहेत.