amruta fadnvis

नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्णाची(corona patients) संख्या मोठ्या प्रमाणाच वाढत आहे. रुग्णाला उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकार कारोनाच्या नावावर भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस(amruta fadanvis tweet) यांनी केला आहे.

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात राज्य सरकार धारेवर धरलं होतं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं सापडल्यानंतर काही दिवसांनी स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयित मृत्यू झाला. त्यामुळे आत्ता राज्याचं राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या प्रकरणी आत्ता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणाच वाढत आहे. या रुग्णाला उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकार कारोनाच्या नावावर भ्रष्टाचार करत आहे. असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे.

    अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर आरोप कले आहेत. वाझे प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. ठाकरे सरकार एकीकडे कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. तर दुसरीकडे उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसूली करण्याची योजना आपल्या काही हस्तकांच्या सोबत आखत आहे. अशा शब्दात ट्विट करुन अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.