मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानं उडाली खळबळ ; सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आलेल्या हॉटलाईनवर सकाळी फोन आला. या फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे.

    मुंबई – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आलेल्या हॉटलाईनवर सकाळी फोन आला. या फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे.

    पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र कोणतीही बॉम्बसदृश गोष्ट या ठिकाणी आढळली नाही.

    दरम्यान पोलिसांना ज्या क्रमांकांवरून फोन आले त्यांची माहिती पोलीस घेत आहेत. ही अफवा ज्याने पसरवली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.