भांडुपमध्ये दुसऱ्याच दिवशी फुटला ‘कृत्रिम तलाव’, लाखोंचे नुकसान

मुंबईत पालिकेकडून सर्व नागरिकांना घरगुती गणपती शक्य असल्यास घराच्या आवारातच कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई महापालिकेकडून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भांडूप शहरात १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. यामधील कोणत्याच तलावाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.

भांडुप : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी जागोजागी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा पर्याय चांगला आहे. परंतु लाकडी साहित्य वापरून भांडुपमध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. हा तलाव शुक्रवारी बांधून पूर्ण झाला आणि अवघ्या काही तासातच फुटला आहे. यामुळे प्रशासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

मुंबईत पालिकेकडून सर्व नागरिकांना घरगुती गणपती शक्य असल्यास घराच्या आवारातच कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई महापालिकेकडून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भांडूप शहरात १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. यामधील कोणत्याच तलावाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.

आमदार कोरगावकर यांनी भांडूपमधील लालाशेठ कम्पाउंड येथे डांबरी रस्त्यावर लाकडी साहित्य वापरुन कृत्रिम तलाव बांधला होता. हा तलाव बांधून झाल्यावर त्यांनी मोठ्या दिमाखात त्याचे भूमिपूजन कले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव फुटून परिसरात तलावाचे स्वरुप आले होते. ह्या तलावाचा फायदा भांडूपमधील ६० टक्के जनतेला होणार होता. परंतु आगमनाच्या दिवशीच या तलावाला जलसमाधी प्राप्त झाली आहे. हीच समस्या विसर्जनाच्या दिवशी उद्भवली असती तर मोठी हानी झाली असती.
या कृत्रिम तलावाचे कंत्राट भांडूपमधील सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला देण्यात आले होते. या कामासाठी तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक खर्च झाल्याचे कळते.