मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला जेवणात सापडले झुरळ

  • मुंबईतील मंत्रालायात बुधवारी दुपारी काही कर्मचारी भोजन करण्यास गेले होते. कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी डाळभात घेतला होता. या डाळभाताच्या ताटात चक्क कर्मचाऱ्यांना झुरळ सापडले आहे. हा कर्मचारी मंत्रालयाच्या कार्यालयात काम करतो. ताटात झुरळ आढळल्याने कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने ते ताट परत घेतले. कर्मचाऱ्याला दुसरे जेवण घेण्यासाठी कॅन्टीन कर्मचारी सांगत होते.

मुंबई – मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना तेथील कॅन्टीन मध्येच जेवण करण्याला भाग पडत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व हॉटेल बंद आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी कॅन्टीन मध्येच जेवत आहे. परंतु बुधवारी दुपारी कर्मचाऱ्याला जेवणात झुरळ आढळ्याने कॅन्टीन मधील जेवणावर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

मुंबईतील मंत्रालायत बुधवारी दुपारी काही कर्मचारी भोजन करण्यास गेले होते. कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी डाळभात घेतला होता. या डाळभाताच्या ताटात चक्क कर्मचाऱ्यांना झूरळ सापडले आहे. हा कर्मचारी मंत्रालयाच्या कार्यालयात काम करतो. ताटात झूरळ आढळल्याने कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने ते ताट परत घेतले. कर्मचाऱ्याला दुसरे जेवण घेण्यासाठी कॅन्टीन कर्मचारी सांगत होते. परंतु जेवणाच्या ताटात झुरळ सापडल्याने कर्मचाऱ्याची जेवण्याची इच्छाच नव्हती. हा प्रकरा मंत्रालायाच्या नव्या इमारतीतील पोटमाळ्यावरील कॅन्टीमध्ये घडला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सुऱक्षेच्या दृष्टिकोनाने आपल्या कुटूंबियांना गावी पाठविले आहे. मुंबईतील हॉटेल्सही बंद असल्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांन कॅन्टीनमध्येच जेवावे लागत आहे. परंतु कॅन्टीनमध्ये जेवणात झुरळ सापडल्याने जेवणावर प्रश्न निर्माण होत आहेत.