शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे अनेक घडामोडी पाहण्यास मिळाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे अनेक घडामोडी पाहण्यास मिळाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्तं 11 आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

    राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुले कोविड 19 संसर्गाची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका, महामंडळांच्या नेमणुका, तसंच महाविकास आघाडीतील काही राजकीय प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यत व्यक्त केली जात आहे.

    विशेष म्हणजे, राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज निवडणुकीत ज्या ठिकाणी आवश्यक लागेल अशा ठिकाणी एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे. त्यामुळे या निवडणुकींच्या दृष्टीने शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही महत्त्वाचा निर्णय होतो का? हे पाहण्याचं ठरणार आहे.