Corona Updates : बुधवारी राज्यातील काेराेना रुग्णसंख्येत वाढ ; ऑक्टाेबर २०२० नंतर पुन्हा रुग्णसंख्येत वाढ ; मुंबईत १५३९ कोरोना रुग्णांची भर

बुधवारी राज्यात तब्बल १२३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,५२,०५७ झाली आहे. आज ९,९१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,९९, २०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२१% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ९९,००८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांची नाेंद

मुंबई : मागील आठवड्याभराच्या तुलनेते बुधवारी राज्यात काेराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टाेबर २०२० नंतर ही वाढ दिसून आली आहे.

बुधवारी राज्यात तब्बल १२३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,५२,०५७ झाली आहे. आज ९,९१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,९९, २०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२१% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ९९,००८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३४% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५४ मृत्यूपैकी ३४ मृत्यु हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २ मृत्यू अकाेला-१ आणि ठाणे-१ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७१,१५,५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,५२,०५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७१,१८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १५३९ कोरोना रुग्ण

दरम्यान मुंबईतही बुधवारी काेराेना रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. दिवसभरात १५३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३३७१३४ एवढी झाली आहे. तर आज ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११५१५ मृत्यूची नोंद करण्यात आली.