एक लंडन, हैदराबादमधील दोन कंपन्यांचे स्वारस्य; मुंबईसाठी एक कोटी लसीचा नियमित आणि अखंडित पुरवठ्याची गरज

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता वॅक्सीन सर्वात महत्त्वाचा पर्याय सिद्ध ठरत आहेत. देशात कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसी असून त्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पालिकेने परदेशातून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने परदेशातून लस उपलब्ध व्हावी, यासाठी ग्लोकल टेंडर काढले होते. परंतु, कोणत्याही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. आता तीन पुरवठादारांनी लस पुरवण्यासाठी स्वारस्य दाखवलेल आहे. यामध्ये लंडनमधील टेलिसिन इंटरनॅशनल लि. कंपनी असून दोन भारतीय (हैदराबाद स्थित) कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांना रशियाची स्पूतनिट वॅक्सीन विक्रीसाठी डिस्ट्रीब्यूटरशिप मिळाले आहे.

  मुंबई : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता वॅक्सीन सर्वात महत्त्वाचा पर्याय सिद्ध ठरत आहेत. देशात कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसी असून त्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पालिकेने परदेशातून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने परदेशातून लस उपलब्ध व्हावी, यासाठी ग्लोकल टेंडर काढले होते. परंतु, कोणत्याही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. आता तीन पुरवठादारांनी लस पुरवण्यासाठी स्वारस्य दाखवलेल आहे. यामध्ये लंडनमधील टेलिसिन इंटरनॅशनल लि. कंपनी असून दोन भारतीय (हैदराबाद स्थित) कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांना रशियाची स्पूतनिट वॅक्सीन विक्रीसाठी डिस्ट्रीब्यूटरशिप मिळाले आहे.

  ग्लोबल टेंडरला स्वारस्य दाखवलेल्या कंपन्यांनी कादगपत्रे जमा केली नाहीत. त्यामुळे ही कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांना २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भतील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. पालिकेने विविध उपाययोजना करून जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र, काही बेफिकीर नागरिक आणि पालिका प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष या कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा वाढला.

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागली. आता लावण्यात आलेला लॉकडाऊन १ जूनपर्यंत असणार आहे. परंतु, सुदैवाने सरकार व पालिका यांनी युद्धपातळीवरील केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता कोरोनावर काहीसे नियंत्रण आले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या मुंबईत लसीकरण सुरू आहे.

  मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईला केंद्र व राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. लसीअभावी पालिकेने मध्यंतरी लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. लसीचा वारंवार होणारा तुटवडा पाहता मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी एक कोटी लसीचा नियमित व अखंडित पुरवठा होण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. मात्र, त्याला केवळ ३ पुरवठादारांनीच प्रतिसाद दिला.

  सध्या दीड कोटी वॅक्सीनची गरज आहे. जर वॅक्सीन उपलब्ध झाली तर पुढील ६० दिवसांत लसीकरण पूर्ण होईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १ कोटी लसीच्या डोसची गरज आहे. तर ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांसाठी ५० लाख डोसची गरज आहे. वॅक्सीनचे उत्पादन करणाऱ्या फायझर, माडर्ना इंक, जॉनसन अॅण्ड जॉनसनसह सिरम इन्स्टिट्यूट ऑॅफ इंडिया आणि भारत बायोटीक निविदामध्ये सामील होतील, याची प्रतीक्षा आहे. लस उत्पादन करणारी एकही कंपनीने सध्या तरी निविदेत भाग घेतला नाही.

  - इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त