Anand Mahindra liked the native jugaad to escape from the corona; Video shared with appreciation

आनंद महिंद्रा(anand mahindra tweet for medical servants) यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांना सलाम केला आहे.

    महिंद्रा ॲन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा(anand mahindra) हे त्यांच्या ट्विट्समुळे कायम चर्चेचा विषय ठरले आहेत.  उद्योग विश्वासोबतच समाजात घडणाऱ्या घडामोडींवर ते कायम आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

    देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असताना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांप्रमाणेच आजही आपल्या जिवावर उदार होऊन रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांना सलाम केला आहे.

    आनंद महिंद्रांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक शेर देशातल्या लाखो आरोग्य सेवकांसाठी लिहिला आहे. “वो कोई और चिराग होते है जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…” असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

    तसेच  “अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!”, असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.