अंधेरी,जोगेश्‍वरीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार – घाटकोपर,भांडूपमध्ये ३ हजाराचा टप्पा पार

मुंबई:अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व प्रभागात ४ हजार ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर,घाटकोपर आणि भांडूप परीसराने ३ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे,दहिसर मध्ये रुग्णवाढीचा दर ६.४ असून हा

मुंबई:अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व प्रभागात ४ हजार ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर,घाटकोपर आणि भांडूप परीसराने ३ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे,दहिसर मध्ये रुग्णवाढीचा दर ६.४ असून हा मुंबईतील सर्वाधिक दर आहे. मुंबईत २७ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे तर दहिसर मध्ये ११ दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत.जी दक्षिण म्हणजे वरळी प्रभादेवीत रुग्ण दुप्पट होण्यचा कालावधी १२ जून रोजी ३८ दिवसांचा होता तो १४ जूनपर्यंत ३३ दिवसांचा झाला आहे. १२ जून रोज येथे रोज १.८ टक्के रुग्णांची वाढ होती.तर,१४ जून रोजी २.१ टक्के दराने रुग्ण वाढत आहेत. अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम म्हणजे के पश्‍चिम प्रभागात रुग्ण दुप्पट होण्यचा कालावधी १२ जून रोजी ३१ दिवसांचा होता तो १४ जूनपर्यंत ३० दिवसांचा झाला आहे.

मुंबईत १४ जून पर्यंत ५७  हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.त्यातील २६ हजार २२३ रुग्णांनी कोविडवर मात केली असून २९ हजार ९० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. संपुर्ण शहरातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.६५ टक्‍क्‍यांवर आला आहे.यात एप्रिल,मे महिन्यातील हॉटस्पॉट असलेल्या जी दक्षिण वरळी प्रभादेवी २.१ टक्के ,जी उत्तर दादर धारावी १.५ई भायखळा,माझगाव १.५ टक्के आणि दादर,माटुंगा पुर्व शिव एफ उत्तर प्रभागात १.३ टक्के दराने रुग्ण वाढत आहे. मुंबईतील सर्वात कमी रुग्णवाढीचा दर  एफ उत्तर आणि एम पुर्व देवनार येथे १.३ टक्के एच पुर्व वांद्रे सांताक्रुझ पुर्व १.४ टक्के आहे.घाटकोपर एन विभागाच्या हद्दीत ३ हजार २७ आणि एस विक्रोळी भांडूप प्रभागात ३ हजार २७ रुग्ण नोंदविण्यात आला आहे.३ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे हे पहिले दोन प्रभाग आहेत.
बोरीवलीपासून दहिसर आणि विक्रोळी पासून मुलुंडमध्ये रुग्ण वाढीचा दर ४ टक्‍क्‍यांहून अधिक आहे.यात,कांदिवलीत (आर उत्तर )४.७ टक्के,बोरीवली (आर मध्य) ४.६ टक्के ,विक्रोळी,भांडूप (एस) ४.२ टक्के आणि मुलूंड (टि) ४ टक्के आहे.
 
 
 प्रभाग – कोविड बाधीत रुग्ण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी (दिवसात )
ए कुलाबा — १३४७—३६
बी सॅन्डहर्स्ट रोड -७१५—३९
सी काळबादेवी -७३१—२०
डी ग्रॅन्टरोड -१७१८—२९
ई भायखळा – ३२५४—४६
एफ उत्तर माटूंगा -३२२१—५५
एफ दक्षिण परळ –३०७०–२६
जी उत्तर दादर धारावी –३८३४–४८
जी दक्षिण वरळी,प्रभादेवी—२८१५—३३
एच पुर्व वांद्रे पुर्व -२९६३—४९
एच पश्‍चिम वांद्रे पश्‍चिम – १६०३–२०
के पुर्व अंधेरी पुर्व –४०७६—१८
के पश्‍चिम अंधेरी पश्‍चिम – ३३२२–३०
एल कुर्ला —-३४५८—४६
एम पुर्व देवनार —-२५३५—-५३
एम पश्‍चिम चेंबूर -२११५ —२४
एन घाटकोपर — ३०२७—२३
एस भांडूप—३०४७—१७
टी मुलूंड —१४०६–१८
पी उत्तर मालाड –२८९८—१६
पी दक्षिण गोरेगाव –१७७६—२२
आर दक्षिण कांदिवली –१९६५–१५
आर मध्य बोरीवली –१६२८–१६
ैआर उत्तर दहिसर —९७६ — ११