अनिल देशमुखांनंतर अनिल परब, दोघेही तुरुंगात जाणार : किरिट सोमय्यांचे गंभीर भाकीत

सक्तवसुली संचलनालय ईडीने देशमुख यांच्यावर ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर भाजप नेते किरिट सोमैय्या यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची २०१०ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे.

  मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांवर जोरदार टिका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

  आता २०२० आणि २०२१ ची मालमत्ताही सापडेल

  सक्तवसुली संचलनालय ईडीने देशमुख यांच्यावर ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर भाजप नेते किरिट सोमैय्या यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची २०१०ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू २०२० आणि २०२१ ची मालमत्ताही सापडेल, असे भाकीत सोमय्या केले आहे.

  वाझे उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा

  अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा, असा दावा त्यांनी केला.

  उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे. या शिवाय अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केला