parambir singh and anil deshmukh

चांदिवाल आयोगाचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी त्यांच्या आयोगाने बजावलेल्या नोटीसांना दुर्लक्ष करत आयोगाची गरज नसल्याचे तसेच याबाबत सीबीआय तपास करत असल्याचे म्हटले होते. आयोगाने जबाब नोंदविण्यासाठी वारंवार समन्स काढूनही ते हजर राहिले नाहीत, किंवा जबाब नोंदविण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे दंडाची शिक्षा फर्मावत आयोगाने त्यांना आता शेवटची संधी देत असल्याचे समन्स काढून बजावले आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जावू शकते.

    मुंबई : माजी गृहमंत्री आनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रूपये वसूलीचे आरोप केल्याच्या प्रकरणात केसमध्ये चौकशी करत असलेल्या एक सदस्यीय न्या कैलास उत्तमचंद चांदिवाल आयोगाने परमबीर सिंह(Parambir Singh ) यांना पंचवीस हजारांचा दंड केला आहे.

    वारंवार समन्स काढूनही गैरहजर

    चांदिवाल आयोगाचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी त्यांच्या आयोगाने बजावलेल्या नोटीसांना दुर्लक्ष करत आयोगाची गरज नसल्याचे तसेच याबाबत सीबीआय तपास करत असल्याचे म्हटले होते. आयोगाने जबाब नोंदविण्यासाठी वारंवार समन्स काढूनही ते हजर राहिले नाहीत, किंवा जबाब नोंदविण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे दंडाची शिक्षा फर्मावत आयोगाने त्यांना आता शेवटची संधी देत असल्याचे समन्स काढून बजावले आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जावू शकते.

    २५ऑगस्ट रोजी शेवटची संधी

    याबाबत न्या चांदिवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, त्यांनी येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्र्याच्या कोविड-१९ करीता असलेल्या निधी खात्यामध्ये २५ हजार रूपयांचा दंड जमा करावा. त्यांनी त्यांचा जबाब देण्यासाठी २५ऑगस्ट रोजी समक्ष हजर रहावे आणि ही त्यांना दिलेली शेवटची संधी असेल. त्यांच्या गैरहजर राहण्यामुळे या आयोगाचे कामकाज थांबवले जावू शकत नाही असे नमूद करत आयोगाने त्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.