parambir singh and anil deshmukh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या विरोधात चौकशीचा फास हळूहळू घट्ट होत चालला आहे. सिंग यांच्या विरोधात तक्रार करणारे पोलीस निरिक्षक भिमराव घाटगे यांनी मुबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सिंग यानी केलेले आरोप मागे घ्यावे म्हणून दाखल केल्या नसल्याचा खुलासा घाटगे यांनी न्यायालयासमोर केला आहे. घाटगे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की सिंग यांच्या पूर्ण सेवाकाळात त्यांनी केलेल्या कृत्यांनी पोलीस खात्याला काळीमा लागला आहे.

  मुंबई, किशोर आपटे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या विरोधात चौकशीचा फास हळूहळू घट्ट होत चालला आहे. सिंग यांच्या विरोधात तक्रार करणारे पोलीस निरिक्षक भिमराव घाटगे यांनी मुबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सिंग यानी केलेले आरोप मागे घ्यावे म्हणून दाखल केल्या नसल्याचा खुलासा घाटगे यांनी न्यायालयासमोर केला आहे. घाटगे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की सिंग यांच्या पूर्ण सेवाकाळात त्यांनी केलेल्या कृत्यांनी पोलीस खात्याला काळीमा लागला आहे.

  दबाव आणण्यासाठी नाही

  राज्य सरकारने सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून घेण्यास सुरूवात केल्यानंतर परमबीरसिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपण माजी गृहमंत्र्यावर आरोप करणारे पत्र लिहिल्यानेच दबाव टाकून तक्रार मागे घेण्यासाठी सरकारकडून खोट्या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात केली आहे. या संदर्भात २१ तारखेला सुनावणी होणार आहे, त्यापूर्वी तक्रारदार घाटगे यांच्या वकीलांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा (ऍट्रोसिटी) अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा सिंग यांनी अनिल देशमुख प्रकरणात आरोप मागे घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी नाही. घाटगे यांचे वकील एस बी तळेकर यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की सिंग यांच्या वर्तनामुळे पोलीस खात्याची बदनामी झाली आहे.

  सिंग यांचा कयास काल्पनिक

  त्यापूर्वी सिंग यांनी न्यायालयात सांगितले होते की, अनिल देशमुख यांच्यावरील आरोप मागे घ्यावे म्हणून मला खोट्या गुन्हेगारी प्रकरणात दबाव आणून फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. घाटगे यांच्या वकीलांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सिंग यांचा हा कयास काल्पनिक आहे. त्यामुळे आम्ही सिंग यांचा हा आरोप फेटाळून लावतो की दबाव आणून आरोप मागे घेण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. त्यात असेही म्हटले आहे की, सिंग यांचा हा कयास तथ्यहिन आहे.

  जानेवारी महिन्यातच तक्रार दाखल

  घाटगे यांनी सिंग यांचा पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी त्यांना आरोप मागे घेतले नाही तर गुन्हे दाखल करण्याबाबत समजाविल्याचा आरोप देखील फेटाळून लावला आहे. घाटगे यांनी म्हटले आहे की आम्ही दाखल केलेल्या गुन्ह्याचा अनिल देशमुख किंवा संजय पांडे यांच्या सोबत सिंग यांचे जे काही वाद असतील त्याच्याशी काहीही संबंध नाही.  घाटगे यांनी त्यासाठी संदर्भ दिले आहेत, त्यांनी म्हटले आहे की सिंग यांच्या विरोधात प्रथम जानेवारी महिन्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी चौकशी झाली नाही त्यामुळे नव्याने या वर्षी तक्रार दाखल केली आहे.

  माझे चारित्र्यहनन करुन अमानुष वागणूकही दिली

  त्यांनी म्हटले आहे की सिंग यांच्या आदेशांवे पालन केले नाही त्यानंतर त्यांच्याकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. प्रतिज्ञापत्रात घाटगे यांनी म्हटले आहे की, सिंग यांनी माझे चारित्र्यहनन केले आणि अमानुष वागणूकही दिली. जाणिवपूर्वक पाच गुन्ह्यात अडकवून मानसिक त्रासही दिला कारण मी त्यांचे बेकायदा आदेश पाळण्यास नकार देत भ्रष्टाचारात साथ देण्यास नकार दिला होता असे  घाटगे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

  खोट्या गुन्ह्यात फसवून त्रास दिला

  त्यांच्या तक्रारीत घाटगे यांनी सिंग यांच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात असताना केलेल्या कुकृत्यांची मालिका सादर केली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान घाटगे देखील ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. त्यांनी आरोप केला आहे की काही आरोपींची नावे वगळण्याप्रकरणात त्यांचे  ऐकले नाही म्हणून त्यांनी खोट्या गुन्ह्यात फसवून त्रास दिला. त्याबाबत त्यानी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत तसेच भादवी च्या विवीध कलमांतर्गत चौकशी करण्याची मागणी करत गुन्हा दाखल केला आहे.