अनिल देशमुखांची उचलबांगडी होण्याचे संकेत, राजेश टोपेंची गृहमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री यांचंही गृहमंत्रीपद जाऊ शकतं, अशी चर्चा सुरु झाली आहे. पूजा चव्हाण आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अनिल देशमुख यांना अपयश आल्यामुळे त्यांच्याकडून गृहखातं काढून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

    मुंबई : आज दिल्लीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली. सचिन वाझे प्रकरण अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने हाताळलं आहे. त्यावर शरद पवार नाराज असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे.

    अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन दूर केल्यास त्यांच्या जागी अजित पावर किंवा जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कोरोना काळात अरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणारे राजेश टोपे यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवारांचा विचार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी राजीनीमा दिल्यास गृहमंत्रीपदासाठी राजेश टोपे यांचं नाव आघाडीवर असेल.

    गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती, त्याचा तपास आता NIA आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. NIA च्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. NIA अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नसल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.