अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : संजीव पलांडेच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपींची गंभीर दखल घेत सीबीआयने देशमुखांविरोधात २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. त्यांनतर ईडीकडून या प्रकऱणाची चौकशी करण्यात आली. त्यात देशमुखांच्या स्वीय सचिव संजीव पलांडे यांची चौकशी करून त्यांना २६ जून रोजी अटक करण्यात आली. पलांडे हे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असून देशमुख यांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम पाहत होते.

  मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ने केलेल्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने ईडीला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपींची गंभीर दखल घेत सीबीआयने देशमुखांविरोधात २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. त्यांनतर ईडीकडून या प्रकऱणाची चौकशी करण्यात आली. त्यात देशमुखांच्या स्वीय सचिव संजीव पलांडे यांची चौकशी करून त्यांना २६ जून रोजी अटक करण्यात आली. पलांडे हे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असून देशमुख यांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम पाहत होते.

  पलांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या अटकेप्रकऱणी मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) काही तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला संजीव पलांडे यांनी याचिकेमार्फत आव्हान दिले आहे. आपण १९९८ पासून सरकारी सेवेत कार्यरत असून निष्कलंक सेवा बजावली आहे. हे संपूर्ण प्रकरण निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने केलेल्या अस्पष्ट आरोपांवर आधारित असून जो या प्रकऱणासह अन्य एका प्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे आपल्याविरोधात कोणताही खटला उभा राहू शकत नसल्याचा दावाही पलांडेनी याचिकेत केला आहे.

  ईडी भारतीय राज्यघटनेचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करत असून आपण कोणताही गुन्हा केला नसतानाही पीएमएलएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच देशमुख यांच्याविरोधात खोटे पुरावे तयार करण्याच्या उद्देशाने आणि राज्याची स्थिरता भंग करण्याच्या हेतूने हा नोंदवून आपल्याला यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला झालेली अटक ही राजकीय प्रेरित असल्याचा आरोप करत खटला रद्द करावा, अशी मागणीही पलांडे यांनी केली आहे.

  सदर याचिकेवर शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. ए. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, ईडीच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितला. त्याची दखल घेत खंडपीठाने ईडीला प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २८ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

  देशमुख यांच्या आदेशावरून सचिन वाझेने मुंबईतील बार मालकांकडून ४.७० कोटी रुपयांची खंडणी गोळा केली. ही खंडणी वाझेने संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आणून दिली. पलांडे व शिंदे यांनी हा खंडणीचा पैसा दिल्लीतील चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला पद्धतीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील श्री साई शिक्षण संस्था या शैक्षणिक व चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवला. यामुळेच यांत पैशांचे मनी लॉन्डरिंग अर्थात गैरवापर झाला. यामध्ये पलांडे व शिंदे, हे दोघेही आरोपी असल्याचे ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.