अनिल देशमुख नंबर वन; ईडीच्या चौकशीत वाझेचा खळबळजनक खुलासा

वाझे सध्या तळोजा येथील कारागृहात कैद आहे. वाझेसोबत काम करणारे सीआयऊ युनिटमधील तत्कालीन कर्मचारीही एनआयएच्या कोठडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात ईडीनेही वाझेची तळोजा कारागृहात चौकशी केली होती. ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात वाझेने देशमुखांचा उल्लेख नंबर 1 असा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.v

    मुंबई : मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणात सहभागाबद्दल एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबई पोलिसांमधून निलंबित करण्यात आलेल्या वाझेचा मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत. परंतू अटक केल्यानंतर 90 दिवस उलटूनही एनआयएने चार्जशीट दाखल केलेली नसल्यामुळे सचिन वाझेने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने अद्याप यावर निकाल दिलेला नाही.

    वाझे सध्या तळोजा येथील कारागृहात कैद आहे. वाझेसोबत काम करणारे सीआयऊ युनिटमधील तत्कालीन कर्मचारीही एनआयएच्या कोठडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात ईडीनेही वाझेची तळोजा कारागृहात चौकशी केली होती. ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात वाझेने देशमुखांचा उल्लेख नंबर 1 असा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.