गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख

सचिन वाझे प्रकरण सुरु असताना, गृहमंत्री बदलणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. गृहमंत्रीपदी अनिल देशमुखचं राहतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

  अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ मध्ये स्फोटक सापडल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. नुकतेचं संजय राठोड यांचं प्रकरण झाल्यानंतर अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटक आढळली, यावरुन विधानसभा अधिवेशनात भाजपने हा मुद्दा गाजवला. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्कॉर्पिओ चे गाडीमालक मनसुख हिरेन यांचा संशयीत मृत्यू झाला. यावरुन भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट केले आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीह मागणीही भाजप करत आहे.

  सचिन वाझे प्रकरण सुरु असताना, गृहमंत्री बदलणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. गृहमंत्रीपदी अनिल देशमुखचं राहतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

  दरम्यान एक वर्षापूर्वी एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले होते. दुर्दैवी तीचा मृत्यू झाला होता. पण अजूनही त्या घटनेला न्याय मिळालेला नाही. गृहमंत्री अनिल देशमुख त्या तरुणीला न्याय कधी देणार असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

  महाराष्ट्रासारख्या संताच्या भूमीत निर्दोश साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर गृहमंत्री एकही शब्द काढत नाहीत. मारेकरी मोकाट फिरत आहेत. असं भाजपने म्हटलं आहे.

  अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं ? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करुन द्यावी लागेल या सर्व प्रकरणात भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

  विकृत बुद्धीचा शर्जिल उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहमंत्री त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाहीत, कारण आपले गृहमंत्री गाढ झोपेत आहेत,” असं म्हणत भाजपाने देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.