ramdas aathwale and anil deshmukh

विरोधककांकडून अनिल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यावरुन राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कवितेच्या माध्यमातुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई : अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची अटक यामुळे राज्याचे वाताराण चांगलेच तापले. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’मुळे चांगलीच खळबळ उडाली. विरोधककांकडून अनिल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यावरुन राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कवितेच्या माध्यमातुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  “अनिल देशमुखजी ने दे दिया है अपने पद का रिझाईन,
  इसलिए परमबीर हो गये शाईन,
  खूश है बेचनेवाले वाईन
  क्योंकी गृहमंत्री अनिल देशमुख जी ने दिया रिझाईन” अशी शीघ्र कविता रामदास आठवलेंनी केली आहे.

  दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, अनिल देशमुख सीबीआय चौकशी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दखल करण्याची शक्यता आहे.