अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

    मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तडकाफडकी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणावरुन राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

    अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

    अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी दरेकरांनी केली आहे.