अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदींना सीबीआयने उचलले

गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं कळतंय. देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं कळतंय. देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे.

    दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! अशा प्रकारचे टिव्ट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

    सीबीआयनं कोणतेही समन्स न बजावता, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोणतीही पूर्व माहिती न देता गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने कसे काय ताब्यात घेतले आहे? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. तसेच सीबीआय कोणाच्या सांगण्यावरुन काम करत आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. हि सीबीआयची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हि कारवाई नियमबाह्य आहे. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे की, राज्यकर्त्यांचा नवीन कायदा या देशात लागू झाला आहे याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या कारवाईचा निषेध करत, सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.