अनिल देशमुख यांचे 100 कोटी वसुली प्रकरण: मुख्य सचिव कुंटे, डीजीपी पांडे आज तरी CBI समोर हजर होणार का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh case) यांच्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, याआधी दोघांनी कार्यालयात येऊन चौकशी करावी, असे सांगत सीबीआयपुढे ते हजर झाले नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh case) यांच्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, याआधी दोघांनी कार्यालयात येऊन चौकशी करावी, असे सांगत सीबीआयपुढे ते हजर झाले नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार कुंटे आणि पांडे यानी पहिल्या समन्सवेळी सीबीआय कार्यालयात न जाता, ऑनलाईन चर्चा केली होती. त्यामुळे आता पुन्हा आलेल्या समन्सनंतर कुंटे आणि पांडे यांच्या भुमिकेची प्रतिक्षा आहे. हवाला प्रकरणी पांडे आणि कुंटे यांना चौकशीसाठी हे समन्स पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.

    दरम्यान, राज्याच्या सायबर पोलीसांनी देखील सीबीआयचे प्रमुख आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना रश्मी शुक्ला गोपनीय अहवाल प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे.