parambir singh and anil deshmukh

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून केंद्रिय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून केंद्रिय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन आढळल्याचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले नसल्याचे कारण देत गृहमंत्र्यांनी १७ मार्च रोजी परमबीर सिंह यांची बदली केली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे कथित उद्दिष्ट दिल्याचा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला.

    या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या विनंतीही केली होती. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होते. सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयानेही सदर अभूतपूर्व प्रकरण असून मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सीबीआयला सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

    त्यानुसार सीबीआयने देशमुख यांचे घर आणि कार्यालये यांवर छापे मारून ११ त्यांची तास चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कुचराई, अधिकारांचा गैरवापर केल्याचे आऱोप ठेवत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भादंवि कलामांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यास देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि कोणत्याही कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.