अनिल देशमुख यांच्या पत्नी अडचणीत; ईडीचे आज हजर होण्याचे आदेश

आरती देशमुख यांचा मनी लाँड्रीग प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र तरीही ईडीने आरती देशमुख यांना समन्स बजावले असल्याची माहिती देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी दिली. ईडीचं हे संपूर्ण प्रकरण सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबावर आधारीत आहे. माजी एपीआय वाझेला अटक कऱण्यात आली आहे. वाझेने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांना दिलेला जबाब वेगळा आहे, असा दावाही त्यांनी केला. कोणतेही पैसे किंवा कशाचीही देवाणघेवाण झालेली नाही हे सुद्धा स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले.

  मुंबई : मनी लांड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावले आहे. देशमुख यांच्या पत्नी आरती यांची याबाबत चौकशी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी आरती देशमुख यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना गुरूवारी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले आहे तिथे त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. याआधी हृशिकेश देशमुखला समन्स बजावण्यात आले होते.

  वकिलाचा दावा

  आरती देशमुख यांचा मनी लाँड्रीग प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र तरीही ईडीने आरती देशमुख यांना समन्स बजावले असल्याची माहिती देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी दिली. ईडीचं हे संपूर्ण प्रकरण सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबावर आधारीत आहे. माजी एपीआय वाझेला अटक कऱण्यात आली आहे. वाझेने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांना दिलेला जबाब वेगळा आहे, असा दावाही त्यांनी केला. कोणतेही पैसे किंवा कशाचीही देवाणघेवाण झालेली नाही हे सुद्धा स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले.

  आरोपांवरच तपास आधारित

  प्रकरणाचा तपास हा फक्त आरोपांवर आधारित असल्याचा दावाही गुमरे यांनी केला. आम्ही जी काही कागदपत्रं मागितली जात आहेत ती वेळोवेळी पुरवत आहोत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही इतक्या काही महिन्यांमध्ये परमबीर सिंग गप्प का असेही कोर्टानेही विचारले आहे असेही ते म्हणाले.

  सुनावणी पूर्ण

  सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निर्णय राखून ठेवला आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेले आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला हजर राहिलेले नाही.