Anil Parab's business partner found with Sachin Vaze's Prado car; Kirit Somaiya's sensational allegation

भाजप नेते डॉ किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे प्रकरणाचा संबंध थेट शिवसेना नेते ऍड. अनिल परब यांच्याशी जोडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस अधिकारी सचिन वाझेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सचिन वाझेच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक प्राडो कार सापडली होती. ही कार सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या ताब्यात आहे. डॉ सोमैय्या यानी आरोप केला आहे की, अनिल परब यांचे भागीदार असल्याचा उल्लेख असलेल्या सदानंद कदम यांचे भागीदार विजय भोसले यांनीच ही कार वाझेला दिली होती. त्यामुळे या कारचा अनिल परब यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा सोमय्या यांनी दावा केला आहे.

    मुंबई : भाजप नेते डॉ किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे प्रकरणाचा संबंध थेट शिवसेना नेते ऍड. अनिल परब यांच्याशी जोडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस अधिकारी सचिन वाझेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सचिन वाझेच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक प्राडो कार सापडली होती. ही कार सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या ताब्यात आहे. डॉ सोमैय्या यानी आरोप केला आहे की, अनिल परब यांचे भागीदार असल्याचा उल्लेख असलेल्या सदानंद कदम यांचे भागीदार विजय भोसले यांनीच ही कार वाझेला दिली होती. त्यामुळे या कारचा अनिल परब यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा सोमय्या यांनी दावा केला आहे.

    परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट

    भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ किरिट सोमैय्या हे नेहमीच खळबळजनक आरोप करत शिवसेना नेत्यांच्या विरोधात तक्रारी करताना दिसतात. सध्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. कोकणातील दापोली येथे परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट उभारला असून त्यासाठी त्यांनी १० कोटी खर्च केले आहेत. या पैशाचा हिशेब द्यावा, असे सांगत सोमय्या यांनी परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.

    पर्यावरण नियमांचे उल्लंघन

    अनिल परब यांनी कोकणातील दापोली येथे वाळूवर एक रिसॉर्ट बांधला असून तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामाची पर्यावरण मंत्रालयाच्या एका विशेष टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्याकरीता भाजपच्या तीन खासदारांनी पर्यांवरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे.