Anjali Damania, a staunch opponent of Eknath Khadse, is preparing to take ED-CBI to court?

एकीकडे दमानिया यांनी आरोप केलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ  खडसे यांना राजकीय बदला घेण्यासाठीच भाजपच्या नेत्यांनी इडीमार्फत नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. त्याचवेळी खडसेंच्या कट्टर विरोधक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता थेट ईडी आणि सीबीआय चा राजकीय वापर होत असल्याचे सांगत न्यायालयाचा दरवाजा खटखटविण्याचा पवित्रा घेतला आहे.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास राजकारणात होत असल्याचे सांगत त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी न्यायालयात जाण्याची भुमिका घेतली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी खडसे यांच्या विरोधात दमानिया यांनी कोर्टात धाव घेतली होती.

एकीकडे दमानिया यांनी आरोप केलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ  खडसे यांना राजकीय बदला घेण्यासाठीच भाजपच्या नेत्यांनी इडीमार्फत नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. त्याचवेळी खडसेंच्या कट्टर विरोधक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता थेट ईडी आणि सीबीआय चा राजकीय वापर होत असल्याचे सांगत न्यायालयाचा दरवाजा खटखटविण्याचा पवित्रा घेतला आहे.

अंजली दमानिया यांनी  याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, “खडसेंना नोटीस मिळाली की नाही याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. मात्र, मी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. “ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास राजकीय वापर होत आहे. एनडीए किंवा भाजप सगळ्यांनीच या यंत्रणांचा वापर केला. आमच्या दोन याचिका न्यायालयात आहेत. ईडीने याची सर्रास चौकशी करावी. ईडीने स्टेटमेंटसाठी बोलावले तर मी नक्कीच जाणार असेही दमानिया म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हीआयडीसी प्रकरणात क्लीन चिट मिळाली. आमचे प्रकरण केआयडीसीबद्दल आहे. जे न्यायालयात आहे. त्यात सुनील तटकरे यांचे नाव आहे. त्याचा लढा मी सुरुच ठेवणार राजकारणात मला पडायचे नाही, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.