सामनाच्या अग्रलेखातील एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या स्वबळावर निवडणूक लढवायचे म्हणत आहेत. पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. पण शेवटी प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणे अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील. पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील.

  मुंबई : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर महाविकास आघाडीतील उरलेल्या दोन पक्षानी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवाव्या या शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तिला पाठिंबा  दिला आहे. शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी मांडली आहे.

  तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील

  महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र त्यातून एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढायची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. त्यादृष्टीने सामनामध्ये मत व्यक्त केलेले दिसते, असे जयंत पाटील यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले. ही महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसते, असेही ते म्हणाले.

  तर समविचारी पक्ष एकत्रित राहतील

  यावर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या स्वबळावर निवडणूक लढवायचे म्हणत आहेत. पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. पण शेवटी प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणे अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील. पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील.

  महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसते

  जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातून एखाद्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढायची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. त्यादृष्टीने सामना मत व्यक्त केले असे दिसते.
  महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसते.

  महाराष्ट्रात पूर्वी अशी प्रथा नव्हती

  दरम्यान, जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या, त्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत. १२ आमदारांचे प्रकरण बरेच दिवस त्यांच्याकडे आहेत त्यावर त्यांचा विचार झालेला नाही. महाराष्ट्रात पूर्वी अशी प्रथा नव्हती, पण यावेळी विलंब झाला आहे. पण आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा देण्यापुरता त्यांचा आणि माझ्या भेटीचा विषय होता

  जमा-खर्चावर त्रयस्थ समितीने लक्ष ठेवावे.

  सेना –भाजप कार्यकर्त्याच्या राड्याबाबत ते म्हणाले की, राम भक्तांनी भक्तीभावाने मंदिरासाठी निधी दिला. हा गोळा झालेल्या पैशात भ्रष्टाचार होत असेल, मंदिर बांधण्यात भ्रष्टाचार करत असतील तर रामापासून हे किती दूर आहे आणि राम त्यांच्यापासून किती दूर आहे हे दिसते. रामाच्या नावाचा आधार घेऊन राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतायत काही लोक करतात हे लोकांसमोर आले. ते म्हणाले की, राम मंदिरातील जमा-खर्चावर त्रयस्थ समितीने लक्ष ठेवावे.

  हे सुद्धा वाचा