चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाडयांची घोषणा

कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनामुळे निराशा आली होती. परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोकण वासीयांसाठी ह्या विशेष रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून धावणार आहेत.

मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशष रेल्वे ट्रेनची घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधित १६२ रेल्वे सोडणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष रेल्वेमध्ये ८२ अप असतील तर ८२ डाउन मार्गावर असतील. याबाबत मध्ये रेल्वेने अधिकृत वेळापत्रकही जाहीर केले आहे. 

कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनामुळे निराशा आली होती. परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोकण वासीयांसाठी ह्या विशेष रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून धावणार आहेत. या ट्रेन पुढे सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरी करीता धावतील. गणेशोत्सवासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या वतीने सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवासाकरिता ट्रेनचे बुकिंग उद्या १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या रेल्वेने कंफर्म तिकिट आसणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असणार आहे.