university final year exam

सर्व महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन माध्यमाद्वारे परीक्षा होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून या परीक्षा घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच राज्यातील काही अतिदूर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. याबद्दर राज्य सरकारच्या शिक्षण विभागकडू दुपारी १ वाजता घोषणा करण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परिक्षांचा मुहूर्त सापडला आहे. परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही परीक्षा होणार आहे. (final year exams) अखेर युजीसीच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे वेळापत्रक (final year exams timetable) तयार करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार झाले आहे.

सर्व महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन माध्यमाद्वारे परीक्षा होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून या परीक्षा घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच राज्यातील काही अतिदूर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. याबद्दर राज्य सरकारच्या शिक्षण विभागकडू दुपारी १ वाजता घोषणा करण्यात येणार आहे.

असे असेल परीक्षेचे नियोजन

१५ ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक घेण्यात यावे. प्रात्यक्षिके हे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात घेतली जाणार आहे. सरकार ह्या दोन्ही पद्धतीचा अवलंब करणार आहे.

परीक्षेचा वेळापत्रक ७ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावा, परीक्षा कमितकमी एक तास अथवा ५० मार्कची परीक्षा असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत निकाल लागावा, असं युजीसीच्या अहवालात म्हटलं आहे. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत.