राज्यात आणखी ३४८ पोलिसांना कोरोनाची लागण

गेल्या २४ तासांमध्ये आणखी ३४८ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच राज्यातील काही भागात कोरोना विषाणू कमी होताना दिसत आहे. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये आणखी ३४८ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १७ हजार ४३९ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार २२५ जण, कोरोनामुक्त झालेले १४ हजार ३७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७७ जणांचा समावेश आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फ्रंट लाईनवर येऊन जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरचा कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे.