ड्रग्ज प्रकरणी अजून एका अभिनेत्रीला पकडले रंगेहात, एनसीबीची धडक कारवाई

भिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास एनसीबीकडून केला जातच आहे. पण आता आणखी एक ड्रग्ज केस एनसीबीसमोर आली आहे. मुंबईत एका अभिनेत्रीला आज रविवारी ड्रग्ज घेताना एनसीबीने रंगेहात पकडलं आहे. प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करते.

 मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा (Drugs Connection) तपास एनसीबीकडून (NCB ) केला जातच आहे. पण आता आणखी एक ड्रग्ज केस एनसीबीसमोर आली आहे. मुंबईत एका अभिनेत्रीला आज रविवारी ड्रग्ज घेताना एनसीबीने रंगेहात पकडलं आहे. प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करते. वर्सोवामध्ये एका ड्रग्ज पेडलरला भेटायला गेली असता एनसीबीने ही धडक कारवाई केली आहे.


एनसीबीच्या मुंबई झोनल टीमने कारवाई केली आहे. याप्रकरणी एनसीबीकडून बराच माल ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच एनसीबीने धडक कारवाई करत एका पेडलरला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून ९९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान दीपक राठोड हे नाव समोर आले आहे. या व्यक्तीचा तपास एनसीबीकडून सुरू आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून मिळते आहे.