Lalbagh household gas cylinder explosion accident; Two died and five were in critical condition

मुंबई : लालबाग येथील साराभाई इमारतीत झालेल्या गॅस गळती दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे.

साराभाई इमारतीतील एका घरात ६ डिसेंबरला गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले. उपचार सुरु असताना त्याच दिवशी संध्याकाळी दोघांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी एकाचा त्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. तर रविवारी आणखी एकाचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६ झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर तीन जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.