आठ दिवसांत आणकी एका मंत्र्याचा राजीनामा; चंद्रकांत पाटील यांचा दावा

येत्या आठ दिवसात आणखी एक मंत्री राजीनामा देईल, असा खळबळजनक दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मंत्र्यांनी काही केले नाही, असे खोटे बोलत आहात. कोर्टाने ठोकले की राजीनामा घेत आहात. एक नाही दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे.

    मुंबई : येत्या आठ दिवसात आणखी एक मंत्री राजीनामा देईल, असा खळबळजनक दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मंत्र्यांनी काही केले नाही, असे खोटे बोलत आहात.

    कोर्टाने ठोकले की राजीनामा घेत आहात. एक नाही दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

    काल एकाने चांगली कमेंट केली की 36 बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचे काय. उरलेल्यांची रांगच लागणार आहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे हा तिसरा मंत्री कोण? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.