मुंबई अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा मृत्यू

आतापर्यंत ४१ अधिकारी,जवान,कर्मचाऱ्यांना कारेानाची बाधा मुंबई :कोरोना विषाणूची बाधा झाल्याने मुंबई महापालिकेच्या आणखी एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोरेगाव येथील अग्निशमन

आतापर्यंत ४१ अधिकारी,जवान,कर्मचाऱ्यांना कारेानाची बाधा

मुंबई : कोरोना विषाणूची बाधा झाल्याने मुंबई महापालिकेच्या  आणखी एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  गोरेगाव येथील अग्निशमन केंद्रातील यंत्र चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.अग्निशमन दलाच्या या यंत्र चालकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या अग्निशमन दलाच्या  जवानांची संख्या दोन वर पोहोचली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक इमारती,मंडई, कार्यालये आदींचे सॅनिटायझेनच्या कामात महत्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी व शाहू नगर अग्निशमन दलाच्या केंद्र अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाली होती. 

आतापर्यंत अग्निशमन दलाचे जवान अधिकारी आणि कर्मचारी अशाप्रकारे एकूण ४१ जणांना बाधा झाली आहे. यापैकी २२जवान,अधिकारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील ४ जणांवर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर लक्षणे नसलेले परंत पॉझिटिव्ह असे १४ जण असून त्यांना कोविड केअर सेंटर दोन मध्ये दाखल केले आहे.तर आतापर्यंत तीन  अधिकारी व जवान घरी परतले आहेत.