व्हिराफीन औषध ठरतयं प्रभावी; ड्रॅग कंट्रोल ऑफ इंडिया आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचा दुजोरा

झायडस कॅडीला या कंपनीने तयार केलेल्या व्हिराफिन नावाच्या कोरोनासाठीच्या नव्या औषधाला नुकतेच हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ, रंजन गर्गे यांनी दिली. शिवाय या औषधाला ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने सहमती दिली असल्याची माहिती देण्यात आली.

    मुंबई : झायडस कॅडीला या कंपनीने तयार केलेल्या व्हिराफिन नावाच्या कोरोनासाठीच्या नव्या औषधाला नुकतेच हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ, रंजन गर्गे यांनी दिली. शिवाय या औषधाला ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने सहमती दिली असल्याची माहिती देण्यात आली.

    इंटरफेरॉन हे औषध वायरलच्या विरोधात काम करून मानवी शरीरातील लिम्फोसाईट्स या पांढऱ्या पेशी तयार करून प्रतिकार करतात. तसेच रोगकारक व्हायरसला फुफुसाच्या पेशींवर चिटकू देत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

    यावर बोलताना सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ . रंजन गर्गे यांनी सांगितले कि, याला शास्त्रीय भाषेत पेगेलेटेड इंटरफेरॉन अल्फा २बी असे म्हणतात. इंटरफेरॉनच्या रेणूत बदल घडवुन त्याला जैविक दृष्ट्या सक्षम करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रासायनिक बदल म्हणजे पीईजी म्हणजेच पॉलीइथिलिन ग्ल्यकॉल रेणूंमुळे घडवून आणला जातो.
    कॅलिफोर्निया गॅलियड सायन्सेस या कंपनीने तयार केलेले रेमेडिसवीर हे औषध सुद्धा मुळात हिपॅटायटिस सी, इबोला मणी मारबर्ग या वायरल आजारांसाठी निर्माण केले होत. हि दोन्ही औषधे मुळात विशेष कोरोना साठी नसल्याचे यावेळी पुन्हा एकदा सांगण्यात आले.

    ही औषध अँटिव्हायरल औषधे आहेत. इंटरफेरॉन हे औषध वायरलच्या विरोधात काम करणारे प्रभावी नैसर्गिक ग्लयकोप्रोटीन असून वायरल शरीरात शिरला म्हणजे त्याच्या विरोधात मानवी शरीरातील लिम्फोसाईट्स या पांढऱ्या पेशी त्या वायरलला प्रतिकार म्हणून नैसर्गिकरीत्याच इंटरफेरॉन तयार करतात. रोगप्रतिकार शक्ती म्हणून हि सर्व यंत्रणा आपल्या शरीरात कार्यरत असतेच त्यात हे इंटरफेरॉन रोगकारक व्हायरसला फुफुसाच्या पेशींवर चिटकू देत नाही. आणि रोग्याला कोरोना पासून मुक्ती मिळते. या औषधाच्या चाचण्या सकारात्मक असल्याचे ड्रग कॉन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने देखील मान्य केले असल्याचे सांगण्यात आले.