सचिन वाझे प्रकरणात नवी मुंबई कनेक्शन उघड; तपासाचा गुंता आणखी वाढला

वाझेंच्या तपासादरम्यान एनआयएने (NIA) तब्बल पाच आलिशान गाड्या जप्त केल्या आहे. यात मुंबईतून जप्त केलेली काळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ (Mercedes Car) ही आलिशान कार नवी मुंबईतील नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. २४ फेब्रुवारीला कारमायकल रोडवर जेव्हा हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जिलेटीनसह सापडली. ही गाडी तिथे उभी करण्यापूर्वी तब्बल १५ ते २० दिवसांपूर्वी सचिन वाझे यांनी याच काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंझ मधून कारमायकल रोडची रेकी केली होती असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

  मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन उघड झाले आहे. यामुळे तपासाचा गुंता आणखी वाढला आहे.

  वाझेंच्या तपासादरम्यान एनआयएने (NIA) तब्बल पाच आलिशान गाड्या जप्त केल्या आहे. यात मुंबईतून जप्त केलेली काळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ (Mercedes Car) ही आलिशान कार नवी मुंबईतील नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
  २४ फेब्रुवारीला कारमायकल रोडवर जेव्हा हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जिलेटीनसह सापडली. ही गाडी तिथे उभी करण्यापूर्वी तब्बल १५ ते २० दिवसांपूर्वी सचिन वाझे यांनी याच काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंझ मधून कारमायकल रोडची रेकी केली होती असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

  या कारचा वापर या सगळ्या प्रकरणात असल्याने एनआयएने ही कार जप्त करून तपास सुरू केला आहे. मात्र, ही मर्सिडीज बेंझ कार नर्मदा ऑफशोर कंपनीने २१ नोव्हेंबरलाच कार 24 या जुन्या कार विकत घेणाऱ्या कंपनीला विकली आहे. या व्यवहाराचे पैसे देखील नर्मदा कंपनीला कार 24 या कंपनीने दिले आहेत.

  व्यवहार पूर्ण झाल्याने नर्मदा कंपनीने डिलिव्हरी नोट ही संबंधित कंपनीकडून घेतलेली आहे. यामुळे आपल्या कंपनीचा त्या मर्सिडीज बेंझ कारशी कोणताच संबंध नसल्याचा नर्मदा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव भंडारी यांनी सांगितले. मात्र, या बाबत ना एनआयए ना एटीएसने आपणाकडे चौकशी केली नसून या मर्सिडीज बेंझ कारची चौकशी करण्यात आली तर आपण सर्व कागदपत्रे सादर करू, असे देखील भंडारी म्हणाले.

  नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार त्यांच्या ताब्तायत नव्हती. तीचा ताबा कार 24 या कंपनीकडे होता मग ही कार सचिन वाझे यांच्या ताब्यात कशी आली. कंपनीने ही कार कोणाला विकली की आपल्या ताब्यात असताना साची वाझे यांना वापरण्यास दिली? ही कार वाझेंना देमारी व्यक्ती कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे.

  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी कार सापडल्यांनतर या कारचा कथित मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. यानंतर वाझेंना अटक करण्यात आली. एनआयए या सर्व प्रकरणी वाझेंची चौकशी करत आहे.