टेन्शन वाढवणारी बातमी! कोरोनाचा आणखी एक भयंकर स्ट्रेन; नवीन व्हेरियंन्ट ‘म्यु’चा धोका वाढतोय

जगात कुठल्याही विषाणूची महामारी येते तेव्हा, असंख्य लोक बाधित होतात, त्या वेळेला लोकांवर त्याचा परिणाम होतोच. परंतु या विषाणूच्या रचनेमध्ये सुद्धा अंतर्गत रचनेमध्ये बदल होत जातो. या बदलाला ‘म्युटेशन’ असे म्हणतात. आणि त्या बदलापासून नवीन निर्माण होणाऱ्या विषाणूला ‘म्युटेंट’ असे म्हणतात.

    मुंबई : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अशातच संशोधकांना कोरोनाबाबत आणखी धक्कादायक माहिती मिळली आहे. कोरोनाच्या आणखी भयंकर रूपाचा (स्ट्रेन) शोध लागला आहे.

    जगात कुठल्याही विषाणूची महामारी येते तेव्हा, असंख्य लोक बाधित होतात, त्या वेळेला लोकांवर त्याचा परिणाम होतोच. परंतु या विषाणूच्या रचनेमध्ये सुद्धा अंतर्गत रचनेमध्ये बदल होत जातो. या बदलाला ‘म्युटेशन’ असे म्हणतात. आणि त्या बदलापासून नवीन निर्माण होणाऱ्या विषाणूला ‘म्युटेंट’ असे म्हणतात.

    कोरोनाची महामारी जानेवारी २०२० पासून सुरू झाली. आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा कोरोनाच्या व्हेरियंन्टमध्ये बदल घडलेले आहेत. कोरोनामध्ये स्वत:ला वेगाने बदलण्याची (म्युटेंट) क्षमता आहे. आणि या क्षमतेमुळेच तो अत्यंत वेगाने पसरू शकतो, असा दावा संशोधकांना केला आहे. भारतात कोरोना सध्या ‘सिंगल म्युटेशन’ अवस्थेत आहे. भारतात तो स्वत:त बदल करण्यात अजून यशस्वी झालेला नाही.

    सध्या कोरोनामध्ये नवीन म्युटेशन आले आहे, “बी.१६२१” असं नाव जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरियंन्टला दिले आहे. या नवीन व्हेरियंन्टला ‘म्यु’ असं म्हणतात. परंतु याला समजायला सोपं जावे म्हणून, या व्हेरियंन्टला अल्फा, बीटा, गामा, अशा प्रकारची सुद्धा नावे देण्यात आली आहेत. जानेवारी २०२१ मध्ये दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या देशांमध्ये असं लक्षात आलं की, एक वेगळ्या प्रकारचा व्हेरियंट लोकांना बाधित करतोय, आणि तपासणी केल्यावर “बी.१६२१” अर्थांत ‘म्यु’ असं नवीन कोरोनाचे व्हेरियंन्ट आल्याचे संशोधकांचा लक्षात आले.

    कोलंबियाबरोबर या शेजारच्या राष्ट्रांमध्येही साधारण तिथे जानेवारी ते जून दरम्यान १३ टक्के रुग्ण ‘म्यु’चे सापडले आहेत. परंतु जुलै महिन्यापासून युरोपीय देशांमध्ये मात्र एकही रुग्ण सापडलेला नाही. त्याचप्रमाणे साधारण ४० देशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंन्ट ‘म्यु’ आढळला आहे. जगात ९ टक्क्यापेक्षा अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. म्हणजे १००० रुग्णापाठीमागे १ रुग्ण ‘म्यु’ चा आढळला आहे.

    जुलै महिन्यामध्ये साधारण दहा टक्के रुग्णांना ‘म्यु’ची बाधा झाली आहे. युरोपमध्ये अनेक रुग्णांचे यामुळं मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत असा लोकांना सुद्धा ‘म्यु’ची बाधा झालेली आहे. यावर आता अमेरिका, इंग्लंड आदी देशामध्ये यावर संशोधन सुरू केले आहे. त्यानंतर असं लक्षात आलं आहे की, हा जो व्हेरियंन्ट आहे याची संक्रमणशक्ती अधिक आहे.

    एकापासून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत कोरोना विषाणूची ३० वेगवेगळी रूपे विकसित झाली आहेत. स्वत:त बदल करून घेण्याच्या (म्युटेंट) कोरोनाच्या क्षमतेकडे लक्ष न दिल्यामुळेच त्यावरील औषध शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. येत्या काही दिवसांमध्ये याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे काळजी अधिक घेणे गरजेचं आहे. भारतात अजूनही ‘म्यु’ हा व्हेरियंन्ट सापडलेला नाही. तरी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]