अँटालिया स्फोटकं प्रकरण: सचिन वाझेंना नजरकैदेत ठेवले तर काय होईल? NIA चा हाय कोर्टात खळबळजनक दावा

अंबानी घराबाहेरील स्फोटकं(Antalya blast case) आणि मनसूख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने(Sachin Waze) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ह्रदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला वाझेने आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबई : अंबानी घराबाहेरील स्फोटकं(Antalya blast case) आणि मनसूख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने(Sachin Waze) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ह्रदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला वाझेने आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रद्यासंबंधित त्रास असल्याने ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात वाझेवर १४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर वाझेने विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करत शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. वाझेला घरात नजरकैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो, असा दावा करत एनआयएकडून अर्जाला विरोध करण्यात आला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने वाझेचा अर्ज फेटाळून लावला. विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आता वाझेने उच्च न्यायालयात अँड. सुदीप पासबोला आणि अँड. रौनक नाईक यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

    वाझेला खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. मात्र, कारागृह रुग्णालयातील स्थिती खराब असून वाझेंचा तब्येतीच्या दृष्टीने सुसज्ज नाही. शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा अदयापही भरलेल्या नाहीत. त्यामुळे संसर्ग होण्याची भिती असून वाझेंना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे कारागृह रुग्णालयात ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे याचिकेतून नमूद करण्यात आले आहे. सदर याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनाणी पार पडली. तेव्हा, वाझे एप्रिल २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत आहे.

    जर, वाझेला घरात नजरकैदेत ठेवण्यात आले तर त्याला निवासस्थानी वेगळ्या खोलीत संपूर्ण एकांतात ठेवण्यात येईल, अशी बाजू अँड. पासबोला यांनी खंडपीठासमोर मांडली. खंडपीठाने एनआयएला विचारणा केली असता एनआयएतर्फे उपस्थित असलेले विशेष वकील संदेश पाटील यांनी अर्जाला प्रतिसाद देण्यासाठी वेळ मागितला. त्याची दखल घेत खंडपीठाने एनआयएला आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.