शस्त्रक्रियेनंतर बरे वाटेपर्यंत घरात नजरकैदेत ठेवा; सचिन वाझेचा विशेष न्यायालयात नव्याने अर्ज

तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रद्यासंबंधित त्रास असल्याने ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर १४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली.

    मुंबई (Mumbai) : अंबानी घराबाहेरील स्फोटकं (Ambani home bomb blast) आणि मनसूख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने (Sachin Waze) विशेष न्यायालयात (a special court) नव्याने अर्ज दाखल केला आहे. ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) (open heart surgery) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घऱातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी वाझेने अर्जातून केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणे(एआयए)ला (the National Investigation Agency) (NIA) त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रद्यासंबंधित त्रास असल्याने ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर १४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली.

    त्यानंतर आता वाझेने विशेष सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला असून नुकतीच आपल्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यातून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावे अशी विनंती अर्जातून कऱण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २७ सप्टेंबर रोजी निश्चित केली.