86 टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या कोरोना विरुध्दच्या अँटीबॉडीज, BMC च्या पाचव्या सीरो सर्वेचा रिपोर्ट

कोणत्याही महासाथीला रोखण्यात हर्ड इम्युनिटीची भूमिका खूप महत्त्वाची असते. हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये संबंधित व्हायरसविरोधात अँटिबॉडीज तयार होणं. आजारानुसार हर्ड इम्युनिटीचं प्रमाण वेगवेगळं असतं. कोरोनाव्हायरससाठी हे प्रमाण 70 ते 80 टक्के असल्याचं सांगितलं जातं.

    मुंबई : कोरोना विरोधात लढा देणार्‍यांची रोगप्रतिकारक शक्ती Herd immunity किती वाढली याचा अभ्यास मुंबई महापालिकेने BMC सीरो सर्वेक्षणाच्या Mumbai sero survey report माध्यमातून मुंबईत केला. त्यातून मिळालेले निष्कर्ष मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक असून ८६.६४ टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज्‌निर्माण corona antibodies झाल्या आहेत. मुंबईत लसीकरण झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के आहे. लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज्‌तयार झाल्याचा निष्कर्ष ५ व्या सिरो सर्वेक्षणातून काढण्यात आल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल Iqbal Singh Chahal (IAS) यांनी सांगितले.

    कोणत्याही महासाथीला रोखण्यात हर्ड इम्युनिटीची भूमिका खूप महत्त्वाची असते. हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये संबंधित व्हायरसविरोधात अँटिबॉडीज तयार होणं. आजारानुसार हर्ड इम्युनिटीचं प्रमाण वेगवेगळं असतं. कोरोनाव्हायरससाठी हे प्रमाण 70 ते 80 टक्के असल्याचं सांगितलं जातं.

    BMC ने पाचवा सीरो सर्व्हे रिपोर्ट प्रसिध्द केला. 24 वॉर्डमधील 8,600 रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये  86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज सापडल्या आहेत. कोरोना लशीचे दोन्ही किंवा एक डोस घेतलेल्या 90.26% नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आहेत. लसीकरण न झालेल्या नागरिकांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्येसुद्धा प्रतिपिंडे आढळलेली आहेत.

    लसीकरण झालेल्‍यांपैकी 90.26 टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटिबॉडीज आढळल्या. तर, लसीकरण न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटिबॉडीज आढळल्या. मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये अँटिबॉडीज आढळण्‍याचे प्रमाण वाढले आहे. अँटिबॉडीज आढळल्या असल्या तरी, मास्‍कचा उपयोग, हातांची स्‍वच्‍छता आणि सुरक्षित अंतर इत्‍यादी खबरदारी बाळगणे आवश्‍यकच आहे.