sero survey

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असलेली काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना तीन महिन्यांने पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता सिरोच्या सर्वेक्षणाच्या अहवालातून मांडण्यात आली आहे.

मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची(corona) लागण होत असलेली काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना तीन महिन्यांने पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता सिरोच्या सर्वेक्षणाच्या अहवालातून(sero survey report) मांडण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोना झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याने कोरोनाचा सामना करण्यात यश येते. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरात १४ ते २१ दिवसांमध्ये ॲन्टीबॉडीज बनण्यास सुरुवात होते. परंतु या ॲन्टीबॉडीज शरीरात दीर्घकाळ टिकत नाही. कोरोनामुक्त झालेल्या एक तृतियांश व्यक्तींच्या शरीरातून ॲन्टीबॉडीज नष्ट झाल्याचे तिसर्‍या सिरो सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून तीन महिन्यांनतर ॲन्टीबॉडीज नष्ट होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

पहिल्या व दुसर्‍या सिरो सर्व्हेक्षणामध्ये कोरोना झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ॲन्टीबॉडीज नष्ट झालेल्या अनेक व्यक्ती सापडल्या होत्या. तिसर्‍या सिरो सर्व्हेक्षणानुसार कोरोनामुक्त झालेल्या १४७ लोकांच्या रक्ताचे नमुने तपासले. यामध्ये ६५.३ टक्के लोकांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज सापडल्या, तर ३४.७ टक्के लोकांच्या शरीरातील ॲन्टीबॉडीज नष्ट झाल्याचे दिसून आले. दुसर्‍या सिरो सर्व्हेमध्येही कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या २३२ लोकांच्या रक्ताचे नमूने तपासले असता ३०.७ टक्के लोकांच्या शरीरामध्ये ॲन्टीबॉडीज सापडल्या नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झाले म्हणजे आता पुन्हा आपल्याला कोरोना होणार नाही. हा समज चुकीचा ठरत आहे. परिणामी कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.